Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्रवाशांसाठी विशेष सूचना : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक

प्रवाशांसाठी विशेष सूचना : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉ

रविवारी (१४ एप्रिल) मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वे वर बदलापूर ते कर्जत मार्गवरही मेगाब्लॉक मुळे एकही लोकल धावणार नाही.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉककाळात प्रभादेवी ते चर्चगेट, विरार दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.

प्रभादेवी ते चर्चगेट दरम्यान तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते रविवार पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

माटुुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्गावरील वडाळा रोड – मानखुर्द या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत लोकलसेवा बंद राहील. पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल चालविण्यात येतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *