Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जोशपूर्ण वातावरणात पार पडली हिरानंदानी ठाणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

जोशपूर्ण वातावरणात पार पडली हिरानंदानी ठाणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

ठाणे हिरानंदानी अर्ध मॅरेथॉन स्पर्धा ही देशातील नामांकित मॅरेथॉन स्पर्धां पैकी एक समजली जाते. स्पर्धेचं यंदाचं हे सातवं वर्ष होतं.

ठाणे हिरानंदी मॅरेथॉन स्पर्धा १० फेब्रुवारी २०१९ रोजी हिरानंदानी इस्टेट ठाणे येथे पार पडली. या मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यासाठी ठाणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून धावपटू आले होते. जवळपास १२ हजार धावपटूंनी ह्या वर्षी आपला सहभाग नोंदवला होता.

अर्ध मॅरेथॉन स्पर्धा हि २१.०९७ किलोमीटरची होती. दिनेश कुमार यांनी ही स्पर्धा केवळ १ तास ०९ मिनिटांमध्ये पूर्ण करत पहिला क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे महिलांमध्ये आरती पाटील हि पहिली आली. तसेच १० किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषांमध्ये चंद्रकांत मानवाडकर तर महिलांमध्ये पूनम सोनूदेव पहिले आले. स्पर्धेचे प्रमुख आयोजक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस व हिंदी सिनेकलाकार व सेलिब्रिटी धावपटू राहुल बोस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार संजय केळकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेला हजेरी लावली होती.

या स्पर्धेसाठी आयोजकांनी पाणी व स्वछतागृहांची उत्तम व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्थेचे ठाणे पोलिसांनी केलेले योग्य नियोजन यामुळे ठाणे हिरानंदी मॅरेथॉन स्पर्धा सुरळीत पार पडली.

कुटुंब रंगलय धावण्यात 

हिरानंदी ठाणे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत दरवर्षी बरेच स्पर्धक सह कुटुंब आपला सहभाग नोंदवतात. दिवस रविवारचा असतो, तो अशा प्रकारे मार्गी लावला जातो. या वर्षी पहिल्यांदाच मुलुंड मध्ये स्थायिक असलेले डॉक्टर सचिन आनंद यांनी आपल्या पत्नी आणि मुलासोबत या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत निरोगी व सुदृढ कुटुंब स्वास्थाचा संदेश लोकांना दिला आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *