Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वर्ष २०२२ मध्ये फास्टैग द्वारे इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन ४६% नी वाढले

वर्ष २०२२ मध्ये फास्टैग द्वारे इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन ४६% नी वाढले

नवी दिल्ली/मुंबई, दि. २४: मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. वर्ष २०२२ मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात २०२१ च्या ३४,७७८ कोटी रुपये संकलनाच्या तुलनेत अंदाजे ४६ टक्क्यांनी वाढ होऊन ते ५०,८५५ कोटी रुपये झाले आहे.  डिसेंबर २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन १३४.४४ कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक  संकलन २४ डिसेंबर २०२२ रोजी १४४.१९ कोटी रुपये झाले.

याचप्रमाणे वर्ष २०२२ मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत ४८% नी वाढ दिसून आली. वर्ष २०२१ आणि वर्ष २०२२ मध्ये अनुक्रमे २१९ कोटी आणि ३२४ कोटी फास्टैग व्यवहार झाले. आजमितीला एकूण ६.४ कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही वाढ झाली असून ती २०२२ मध्ये १,१८१ (३२३ राज्य महामार्ग टोलनाके) इतकी झाली आहे मागील वर्ष २०२१ मध्ये ही संख्या ९२२ होती.

यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी २९ वेगवेगळ्या राज्यांच्या संस्था/अधिकारिणी सह  सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *