फडणवीस म्हणाले स्वाभिमान जपण्याचा सल्ला बाळासाहेबांनी दिला; त्यावर ट्रोलर म्हणाला जे स्वतःच्या शब्दाची किंमत करू शकत नाही, जग त्यांची किंमत …”
मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं निमित्त साधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट केलं आहे. ज्या मार्फत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोमणा मारला आहे. या ट्विट मध्ये ते म्हणतात की, “स्वाभिमान जपण्याचा सल्ला बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला.” यासोबत असलेल्या व्हिडिओत बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाच्या चित्रफिती एकत्र केल्या आहेत. पण नेमकं या ट्विट ला ट्रॉलर्स नी हेरलं आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रॉल करायला सुरुवात केली. जीवन पाचपुते हा ट्रोलर म्हणातो, “तुम्ही हट्ट सोडून #हिंदूहृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांच्या सन्मानार्थ अडीच वर्षे द्यायलाच हवं होतं….
#साहेबांना #स्मृतिदिन विनम्र अभिवादन 🙏”
दिनेश वाघोडे म्हणतात, “बाळासाहेबांच्या बद्दल इतका आदर आहे तर त्यांच स्वप्न म्हणून होवू द्यायचा होता ना 2.5 वर्षे सेनेचा मुख्यमंत्री नंतर तुमच राज्य होत ना ?”
रोहन चव्हाण म्हणतात की, “याच स्वाभिमान आणि अस्मितेसाठी #शिवसेना आज वेगळी झाली आहे. जे स्वतःच्या शब्दाची किंमत करू शकत नाहीत, जग त्यांची किंमत करत नाही.
याच स्वाभिमान आणि अस्मितेसाठी #शिवसेना आज वेगळी झाली आहे. जे स्वतःच्या शब्दाची किंमत करू शकत नाहीत, जग त्यांची किंमत करत नाही.#शिवसेना #मी_भाजप_सोडतोय#मी_भाजपा_सोडतोय #म #मराठी#बाळासाहेब_ठाकरे #मीपुन्हायेईन
— Rohan Chawan (रोहन रमाकांत चव्हाण) (@RohanRChawan) November 17, 2019
आतिष म्हात्रे याने मुख्यमंत्र्यांना टोलवत म्हटले की, “माननीय बाळासाहेब व शिवसेनेमुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि तुम्ही त्यांचा पक्षच संपवायला निघालात…
#मी_भाजप_सोडतोय”
आशुतोष गुऱ्हाळे याने तर बाळासाहेबांचा भाजपा सोबतच्या युतीबाबतच जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात बाळासाहेब ठाकरे भाजपच्या नेत्यांना जागावाटपाच्या मुद्द्यावर फटकारताना दिसत आहेत.
Best ever fitting reply by balasaheb pic.twitter.com/opimd7qmc9
— AGurhale (@AGurhale) November 17, 2019
एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट त्यांच्यावरच उलटलेलं दिसत आहे.
