शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क एक अतूट नाते !
मुंबई: आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ७ वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मधील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी महाराष्ट्रातून तसेच देशभरातून शिवसैनिक, नेते, आमदार, खासदार तसेच कला व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मानवंदना देण्यासाठी येत आहेत. काल मध्यरात्री पासून या ठिकाणी लोकं जमा होत आहेत. स्मृतिस्थळावर फुलांची विशेष सजावट करण्यात आलेली आहे.
दादर मधील शिवाजी पार्क म्हणजे तमाम शिवसैनिकांची पंढरीच. याच ठिकाणी गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आयोजित करण्यात येतोय. येथून त्यांनी अनेक नेत्यांवर मिश्किल व कठोर फटकारे लगावले. या ठिकाणी बाळासाहेबांची भाषणं ऐकायला तुफान गर्दी व्हायची. या बाबतच्या जुन्या आठवणी शिवसैनिक पार्कातल्या कट्टयावर अनेकदा काढतात. १७ जुलै २०१७ रोजी बाळासाहेबांच्या निधनानंतर याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.