Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारत पाकिस्तान विरोधात अत्यंत कडक कारवाईच्या तयारीत : डोनाल्ड ट्रम्प

भारत पाकिस्तान विरोधात अत्यंत कडक कारवाईच्या तयारीत : डोनाल्ड ट्रम्प

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘या हल्ल्याचा बद्दला घेण्यासाठी भारत काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

भारताने या हल्ल्यात आपले जवळपास ४० जवान गमावले आहेत.आणि त्यामुळे भारत खूप कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले.

भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव कमी व्हावा, अशी आमची इच्छा आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प बोलत होते.

अमेरिका सरकार पाकिस्तानला दरवर्षी १.३ बिलियन डॉलर इतकं आर्थिक सहाय्य करत होती. या मदतीचा पाकिस्तान गैरफायदा उचलत होतं. आम्हाला अपेक्षित कृती पाकिस्तान करत नसल्यामुळं आमच्या सरकारनं ही मदत बंद करून टाकली. मात्र, सध्या पाकिस्तानशी आमची चर्चा सुरू आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *