Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एकहाती सत्ता दिल्यास चमत्कार घडवून आणेन – मनसेप्रमुख राज ठाकरे

Raj Thackarey

एकहाती सत्ता दिल्यास चमत्कार घडवून आणेन – मनसेप्रमुख राज ठाकरे

“माझ्या हाती एकहाती सत्ता द्या मी चमत्कार घडवून दाखवेन” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

पुण्यातील कोंढवा भागातील ई-शाळा प्रकल्पाच्या उद्घाटनाला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी पुणे महापालिकेचे उदाहरण दिले. सध्या पुणे महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. जर पुण्यात काही नवीन बदल घडवून आणायचा असेल तर तुम्ही सर्वांनी मला एकहाती सत्ता द्यावी आणि मग बघा मी कसा चमत्कार घडवून आणतो.

लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत माझा तोफखाना तयार झाला आहे. मी फक्त आचारसंहितेची वाट बघतो आहे. निवडणुका लागताच मी पुण्यात येईन तेव्हा ज्यांची फाडायची त्यांची फाडेनच असाही इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. पुणे महापालिकेत मनसेचे जर १६२ नगरसेवक निवडून आले तर अनेक चमत्कार घडतील मात्र ते घडवून आणणे फक्त तुमच्या हातात आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली तसेच महाआघाडीने आघाडी मनसेला सामावून घेण्यासाठी नकार दिल्याने आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *