उणे शून्य सेल्सिअस तापमानात ‘ते’ जखमी १७ सैनिकही हुतात्मा झाले….
लडाख: पूर्व लडाख प्रांतातील वास्तविक नियंत्रण रेषेवर अतिक्रमण प्रश्नी भारत व चीन मधील सैनिकांत सोमवारी रात्री झालेल्या झडपेबाबत आता एक मोठा व धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सुरवातीला या झडपेत सैन्याचे एक कर्नल व दोन सैनिकांसह एकूण ३ जवान हुतात्म्या झाल्याची माहिती अधिकृतपणे जाहीर झाली होती पण आता रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार यावेळी एकूण २० भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याचे समोर आले आहे. या शिवाय हा आकडा वाढण्याचीही भीती आहे.
चीनने कपटाने केलेल्या या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याने चीनचे ४३ सैनिक मारल्याची खबर आहे. सोमवारी रात्री झालेल्या झडपेत भारताचे सैनिक याच भागात जखमी अवस्थेत बराच वेळ विव्हळत होते. या नंतर काहीवेळाने या भागातील तापमान उणे शून्य अंश सेल्सिअस गेल्यामुळे अखेर जखमी १७ सैनिकही याठिकाणी हुतात्म्या झाले. देशभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे तर मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
