Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १९५ उमेदवारांची यादी जाहीर

या यादीत महाराष्ट्रातल्या एकही उमेदवाराचा समावेश नाही

नवी दिल्ली, दि. २: केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा उत्तर प्रदेशातल्या वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या यादीचं वैशिष्ठ्य म्हणजे यात महाराष्ट्रातल्या एकही उमेदवाराचा समावेश नाही. या उमेदवार यादीमध्ये ३४ केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांच्या कोटा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय २ माजी मुख्यमंत्र्यांचाही यादीत समावेश आहे. या यादीत २८ महिला, २७ अनुसुचित जातीचे, १८ अनुसुचित जमातीचे आणि ५७ इतर मागासवर्गीय आहेत. महत्त्वाच्या उमेदवारांमध्ये गांधीनगरमधून अमित शहा, लखनौतून राजनाथ सिंग, अमेठीतून स्मृती इराणी यांचा समावेश आहे. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, राजीव चंद्रशेखर, भुपेंद्र यादव, जी. किशन रेड्डी, ज्योतिरादित्य शिंदे, अजय मिश्रा, अर्जुन राम मेघवाल, देवुसिंग चव्हाण, राजा भैय्या, हेमा मालिनी यांनाही भाजपानं उमेदवारी दिली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *