Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोरात कठोर कारवाईचे आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोरात कठोर कारवाईचे आदेश 

भंडारा, दि. ९: भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा नवजातांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली. नवजात अर्भकांच्या कक्षात १७ बालकं दाखल होती. रात्री अचानक शार्टसर्किट होऊन या कक्षात धूर पसरला, रुग्णालय प्रशासनाने सर्व बालकांना त्यातून बाहेर काढलं, मात्र दहा बालकांचा मृत्यू झाला, तर सात बालकांना वाचवण्यात यश आलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंदाटे यांनी ही माहिती दिली.

या संदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक व्यक्त करत म्हणाले की, “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप १० बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत.” या दुर्घटनेत मरण पावलेल्या १० बालकांच्या पालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील त्यांनी केली तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावर देखील उपचार करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *