Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईकरांसाठी बेस्ट ची जंबो भाडेकपात; आदित्य ठाकरेंकडून बेस्टला ‘बेस्ट ऑफ लक’

मुंबईकरांसाठी बेस्ट ची जंबो भाडेकपात; आदित्य ठाकरेंकडून बेस्टला ‘बेस्ट ऑफ लक’

शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना भाडेकपातीची भेट दिली आहे. सध्या दोन किलोमीटर साठी आठ रुपये असलेले भाडे आता पाच किलोमीटर साठी पाच रुपये करण्याचा प्रस्ताव काल बेस्ट समितीने मंजूर केला. तसेच बेस्टच्या ताफ्यात नवीन वातानुकूलित व इलेक्ट्रिक बसेस चा समावेश करण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव आधी स्थायी समितीकडे व नंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम मान्यतेसाठी जाणार आहे. या नंतर जुलै च्या पहिल्या आठवड्यात भाडेकपात अमलात येईल.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुलाबा येथील बेस्ट भवनाला भेट दिली. उपस्थित पत्रकारांना संबोधून ते म्हणाले की मी बेस्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना भेटून त्यांचे आभार मानायला आलो आहे, बेस्टला ‘बेस्ट ऑफ लक’ म्हणायला आलो आहे.
बेस्टचे किमान भाडे पाच रुपये झाल्याने आणि पंधरा किलोमीटरला वीस रुपये अशी भाड्याची रचना झाल्याने वीस रुपयांत कोणालाही मुंबई फिरता येणार असून जास्तीत जास्त एसी बसेस आणण्याचा प्रयत्न असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर व परवडणारा होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाडेकपात केल्यावर हे असतील तिकीट दर :

५ किमी पर्यंत – नॉन ए.सी. ₹५, ए.सी. ₹६
१० किमी पर्यंत – नॉन ए.सी. ₹१०, ए.सी. ₹१३
१५ किमी पर्यंत – नॉन ए.सी. ₹१५, ए.सी. ₹१९
१५ किमी पेक्षा अधिक – नॉन ए.सी. ₹२०, ए.सी. ₹२५

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *