Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमित शहा यांचे भारताच्या पाक वरील विजयावर अनोखे ट्विट

अमित शहा यांचे भारताच्या पाक वरील विजयावर अनोखे ट्विट

भारत आणि पाकिस्तान दरम्यान मँचेस्टर च्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ मधल्या महत्वाच्या सामन्यात भारताने विजय मिळवला. टीम इंडिया ने पाकिस्तान ला ८९ धावांनी पराभूत केले. भारताचा पाकिस्तान वर वर्ल्ड कप मधला सलग सातवा विजय आहे.

भारताच्या या विजयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. या लिस्ट मध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा ही आहेत. अमित शहा यांनी टीम इंडिया ला या सामन्यात मिळालेल्या विजयावर एक ट्विट करता असे लिहिले आहे की, “भारताची पाकिस्तानवर अजून एक स्ट्राईक. निकालही तोच लागला. पूर्ण टीम ला शानदार प्रदर्शनासाठी शुभेच्छा. प्रत्येक भारतीयाला या विजयावर गर्व आहे, याचा आनंद साजरा करत आहे.”

अशा प्रकारे अमित शहा यांनी आपल्या ट्विट मध्ये पाकिस्तानला टोमणा मारत सर्जिकल स्ट्राईक चा उल्लेख केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *