Aditya on Republic day
आदित्य ठाकरे स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्याची अटकळ
यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीची तयारी करत असताना आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची अटकळ आहे. त्यामुळे
सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच ते विविध सामाजिक संघटनांबरोबर सक्रिय आहेत. पर्यावरण कार्यकर्ते अफरोझ शाह यांच्याबरोबर किनारे स्वच्छता मोहिमेतही ते नित्यनेमाने आपला सहभाग नोंदवतात. तसेच शिवसेनेला दिल्लीत आपलं कोणी हक्कच माणूस पाठवणं सध्याच्या घडीला महत्वाचं वाटतंय.
लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून आणि उत्तर पश्चिममधुन आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुक लढतील अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ भाजपकडे आहे तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे.
