Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विडिओ पहा : मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Featured Video Play Icon

विडिओ पहा : मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी आज आपल्या जवळपास ५ हजार कार्यकर्त्यां बरोबर जुन्नर ते शिवसेना भवन, दादर अशी रॅली काढत स्वगृही परत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उपस्थित होते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीआधी मतदारसंघातील पक्षीय राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेनेतील आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यांनतर मनसेच्या तिकिटावर उभे राहत त्यांनी शिवसेनेच्या आशाताई बुचके यांचा पराभव करत विधानसभा निवडणुकीत विजय संपादित केला. त्या वर्षीच्या निवडणुकीत ते मनसेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले बाकी मनसेचे सर्व आमदार पराभूत झाले. आता बरोबर साडेचार वर्षांनी त्यांनी शिवसेनेत पुनःप्रवेश केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसे ते मनसेचे आमदार असून मनसेच्या व्यासपीठावर फारच थोड्या प्रसंगी दिसले.

गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेतील ६ नगरसेवकांनी मनसेला सोडून शिवसेनेची साथ दिल्यानंतर आता उरलेल्या एकमेव आमदारानेही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे तसेच पक्षीय रचना बदल आणि स्पष्ट धोरणे आखून भविष्याकडे वाटचाल करण्याची गरज असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *