पुलवामा येथील भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ – राज ठाकरे
काल सायंकाळी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादि संघटनेने CRPF जवानांच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला.
या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत, तर 5 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. या भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला.
भारताने या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्वीट करुन या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे की,”पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे. @narendramodi
#Pulwama #KashmirTerrorAttack
पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.
सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे. @narendramodi— Raj Thackeray (@RajThackeray) February 14, 2019
