…..म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेऊ शकले आरे कारशेड ला स्थगिती देण्याचा निर्णय
मुंबई: ऐन निवडणुकीच्या हंगामात मेट्रो प्रशासनाच्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी आरे कॉलनीतील कारशेड साठी वृक्षतोडीला सुरुवात केली. ज्यामुळे समस्त निर्सग प्रेमी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर भडकले होते. यावेळी शिवसेनेवरही अनेकांनी टीका केली ज्यात आप च्या काही नेत्यांचा समावेश होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही सत्तेत आलो की आरे ला जंगल घोषित करू.
आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताना नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. मुळात हे करणं उद्धव यांना शक्य झालं कारण त्यांची भाजप सोबत युती मोडली गेली. हेच जर भाजपसोबत युती असती तर यावरून इगो इशू झाला असता. कारण मेट्रोच्या प्रमुख अश्विनी भिडे या माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खास गोटातल्या समजल्या जायच्या. आता नेमकं डाव उलटल्यामुळे शिवसेनेला दिलेल्या वचना प्रमाणे कार्यवाही करणं शक्य आहे.
