देवेंद्र फडणवीस नव्या सरकारला म्हणाले, “महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!”
मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकार च्या नव्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीवरून थेट सत्ताधारी पक्षावर तोफ डागली आहे. ट्विट करत ते म्हणाले की, ”
कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली.
मग बहुमताचे दावे कशासाठी?”
तसेच ते म्हणाले, “या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?
नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी?
स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का?
अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?”
आपल्या तिसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी सरकारला याचा जाब विचारला आहे. ते म्हणाले की, “भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?
महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!”
कालही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीका केली होती.
