मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची केली मागणी
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्रात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदतीचं वाटप व्हावं ह्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. यावेळी मनसेचे कल्याणचे नवनिर्वाचित आमदार राजू पाटील, मनसे नेते नितीन सरदेसाई, माजी आमदार परशुराम उपरकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नेत्या रिटा गुप्ता, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते.
