निलेश राणे यांनी केली संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका
मुंबई: नारायण राणे यांचे जेष्ठ सुपुत्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पुनः एकदा एकेरी उल्लेख करत ट्विटर बॉम्ब टाकला आहे. राज्यात सुरू असलेल्या नाट्याबाबत निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केली होती. आज पुन्हा त्यांनी अशीच एक टिपण्णी केली. ते म्हणाले की, “मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसात शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मचबुत चोपेल.”
मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसात शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मचबुत चोपेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 11, 2019
यानंतर शिवसैनिकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी ट्विट करत म्हटले की, “संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.”
संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 8, 2019
