संसद भवनात पार पडला शपथविधी सोहळा
नवी दिल्ली, दि. ९ एप्रिल : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडून आलेले पार्थ अजित पवार यांनी आज संसद भवनात सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी पार्थ पवार यांनी इंग्रजी भाषेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
या प्रसंगी राज्यसभेतील सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा सदस्य जयराम रमेश, प्रफुल्ल पटेल, लोकसभा सदस्य सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शपथविधीला साक्षीदार राहिले.
याशिवाय राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी तसेच सचिवालयातील इतर वरिष्ठ अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. नव्याने सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर पार्थ पवार यांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यसभेतील नव्या सदस्यांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू असून विविध राज्यांतील निवडून आलेले सदस्य टप्प्याटप्प्याने शपथ घेत आहेत.
