शहाजी (गणेश) संपत खुस्पे यांनी माजी महापौर अशोक वैती यांचा केला पराभव
ठाणे, दि. १६: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये निवडणूक निकालाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. या प्रभागातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शहाजी (गणेश) संपत खुस्पे यांनी शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार आणि पाच वेळा नगरसेवक राहिलेले माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव केला आहे.
मतमोजणीअंती शहाजी खुस्पे यांना १२,८६० मते, तर अशोक वैती यांना १२,१९३ मते मिळाली. अवघ्या काहीशे मतांच्या फरकाने झालेल्या या निकालामुळे शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात उबाठा गटाने विजय मिळवल्याचे चित्र समोर आले आहे.
