आरोग्य: पूर ओसरल्यावर आता खरे आव्हान आहे ते आरोग्य जपण्याचे
पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मुख्यतः उद्भवतात ते साथीचे रोग. ह्यातला प्रमुख रोग म्हणजे –
*लेप्टोस्पायरॉसिस*
*लक्षणे*
तीव्र ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, घसा खवखवणे, पोटदुखी, उलट्या, जुलाब, सांधेदुखी, कावीळ, पुरळ, लालसर डोळे
ही लक्षणे आजाराच्या पहिल्या टप्प्यात दिसून येतात व ह्याकडे *किमान २४ ते कमाल ७२* तासात उपचार न मिळाल्यास रोग बळावू शकतो. (ज्यात मूत्रपिंड व फुफ्फुसात जंतुसंसर्ग, न्युमोनिया, सेप्टिक शॉक वगैरे लक्षणे अंतर्भूत आहेत.)
*प्रतिबंधात्मक उपाय*
वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता.
पाणी उकळून प्यावे.
स्वच्छ व ताजे अन्न खावे.
चिखलात, सांडपाण्यात जाणे टाळावे.
जर जाणे अपरिहार्य असेल तर जखमा असतील तर जखमांवर व्यवस्थित ड्रेसिंग करून पायमोजे, हातमोजे, गमबूट आदी साधने वापरावीत आणि नंतर साबणाने स्वच्छ हातपाय धुवावेत.
चिखल्या झाल्यास त्यावर *कँडीड बी, सोफ्रामायसीन* सारखी मलमे लावावीत.
सांडपाण्यात जंतुनाशक पावडर टाकून त्याची विल्हेवाट लावावी.
तरीही वरीलपैकी लक्षणे दिसल्यास *त्वरित उपचार* घ्यावेत.
*कमी जोखीम असणारा वर्ग*
चिखलाच्या पाण्याच्या संपर्कात एकदाच आलेल्या आणि पायावर जखमा नसलेल्या व्यक्ती.
औषध – कॅप्सूल डॉक्सीसायक्लीन २००
एक डोस.
*जरा जास्त जोखीम असणारा वर्ग*
जखमा असताना चिखलपाण्याच्या संपर्कात आलेल्या आणि अशुद्ध पाणी पिण्यात आलेल्या व्यक्ती.
औषध – कॅप्सूल डॉक्सीसायक्लीन २००
तीन दिवसांसाठी रोज एक डोस.
*गर्भवतीसाठी*
औषध – अझिथ्रोमायसीन ५०० एक डोस
वा लक्षणांच्या तीव्रतेनुसार तीन दिवस.
*लहान मुले*
औषध – अझिथ्रोमायसीन (२००)
किंवा अझिथ्रोमायसीन २५० गोळी.
*जास्त जोखमीचा वर्ग*
सतत चिखलपाण्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती.
उदा. आरोग्य कर्मचारी, सेवाभावी कार्यकर्ते
औषध – कॅप्सूल डॉक्सीसायक्लीन २००
आठवड्यातून एकदा, सहा आठवड्यांसाठी.
वरील उपचार २४-७२ तासांत सुरू होणे अनिवार्य आहे. ह्यात वैद्यकीय तज्ज्ञ लक्षणांच्या तीव्रतेनुसार बदल करू शकतात.
डॉ. क्षमा शेलार, पुणे
आरोग्य विभाग, अक्षर मानव
(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी तेच जबाबदार असतील. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)
