Shivsena Logo
…लवकरच शिवसेना नेमणार एक लाख नवे शाखाप्रमुख
शिवसेना महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ‘माझा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत एक लाख नवे शाखाप्रमुख नेमणार आहे. या बाबतचे वृत्त आज शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात देण्यात आले आहे. या नियुक्त्या करताना कडवट शिवसैनिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते.
शिवसेनेच्या ५३व्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी आपल्या भाषणात ‘माझा महाराष्ट्र… भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना सांगितली होती. येत्या २७ जुलै पूर्वी शाखाप्रमुखांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. संबंधित विभागप्रमुखांनी या नेमणुका करताना स्वतःचे नातलग नको, तर कट्टर शिवसैनिकांचा विचार करावा असे उद्धव ठाकरे यांचे आदेश असल्याचे नेरुरकर यांनी सांगितले. नव्या शाखाप्रमुखांची ओळखपत्र बनवली जाणार आहेत. याच बरोबरीने ग्रामीण भागात १४ जुलै ते २७ जुलै दरम्यान शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
