Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा रामदेव यांच्यासोबत साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा रामदेव यांच्यासोबत साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’

नांदेड/नागपूर: आज जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे. शरीर-मन स्वस्थाचा समतोल साधण्याचा अनमोल फायदा योगसन केल्यामुळे होतो. भारतीय संस्कृतीची पताका जगभर फडकवण्याचं काम योगविद्ये मार्फत होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागोमाग त्यांचे राज्यातील शिलेदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेड येथे योग गुरू रामदेवबाबा आयोजित शिबिरात योगाभ्यास करत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला. या वेळी शेकडोंच्या संख्येने असलेल्या उपस्थितांनी रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. या कार्यक्रमाला शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. नागपुरातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यशवंत स्टेडियम मध्ये नागपूर महापालिका आयोजित शिबिरात योगाभ्यास केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *