Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इराण ने खूप मोठी चूक केली; डोनाल्ड ट्रम्प भडकले

इराण ने खूप मोठी चूक केली; डोनाल्ड ट्रम्प भडकले

मागील काही काळापासून अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. विशेषतः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची कमान जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आली तेव्हा त्यांनी वेळोवेळी इराण ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. व्यापारी निर्बंध लादल्यामुळे तर इराण पूर्णतः बेजार झाला आहे.

आता यात एक भर पडली आहे ती एका आक्रीत घटनेची. इराणने नुकतेच अमेरिकेचे एक शक्तिशाली ड्रोन पडले आणि त्यामुळे आता या दोन देशांत युद्धजन परिस्थिती निर्माण झाली आहे. ड्रोन पाडल्यानंतर संतापलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने खूप मुठी चूक केल्याचे ट्विट आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून केले आहे.

ट्रम्प यांच्या या ट्विट ला इराण च्या लष्करप्रमुखांना आपले लष्कर युद्धासाठी तयार असल्याचे सांगत अमेरिकेला थेट आवाहन दिले आहे. ‘MQ-4C ट्रायटन’ नावाचे अमेरिकेचे ड्रोन इराण च्या हवाई हद्दीत शिरले होते असे इराण तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तर अमेरिकेने दावा केला आहे की सदर ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते.
[6/21, 13:55] Maharashtra Varta Official: या साऱ्या पार्श्वभूमीवर भारताच्या चिंता वाढल्या आहेत. इराण हा भारताला मोठ्या प्रमाणात तेल निर्यात करतो.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *