सर्वोच्च न्यालायाकडून ११ दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द
नवी दिल्ली, दि. ८: बिल्कीस बानो प्रकरणातल्या ११ दोषींची सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. आजीवन कारावासाची शिक्षा झालेल्या या दोषींची १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची सुटका झाली होती. ही सुटका करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार गुजरात सरकारला नव्हे तर महाराष्ट्र सरकारला असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भूयान यांच्या खंडपीठाने आज दिला. हा गुन्हा गुजरातमध्ये घडला होता तरी खटला सुनावणी महाराष्ट्रात झाली होती.
Source – AIR
