कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री जबाबदार
मुंबई, दि. २१: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधीछात्रवृत्ति BANRF शैक्षणिक वर्ष २०२१ या योजनेचे चे पत्रताधारक ८६१ संशोधक विद्यार्थी असून त्यांना शासनाच्या नाकर्तेपणामुळे अधीछात्रवृत्ति पासून वंचित ठेवण्यात आले आहे. याउलट याच विभागाअंतर्गत येत असलेल्या सारथी आणि महाज्योति आणि आदिवासी विकास विभागातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मजूर करण्यात आली आहे.
या संबंधी आंदोलकांचे म्हणणे असे की, “याच अनुषंगाने पात्र संशोधक विद्यार्थी आझाद मैदानात अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करत आहोत . शासनाने आमच्यासोबत जातीवाद केला असून आम्हाला जाणीवपूर्वक या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा घाट रचला आहे. महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात असे घडणे अतिशय निंदनीय असून सामाजिक न्याय विभागानेच आमच्यावर अन्याय केला आहे. आम्ही सरकारला इशारा देत आहोत की पुढील 7 दिवसात आम्हा सर्व पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर न केल्यास आम्ही सर्वजण तीव्र आंदोलन करत आमरण उपोषण करू.”
सदर आंदोलनावर राज्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, राजकिय पक्ष, पँथर संघटना लक्ष देऊन आहेत. आंदोलन चिघळल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदार असाल असे विद्यार्थ्यांच्या वतीने जाहीर करत आहोत.
