भारतीय तटरक्षक दलाकडून रत्नागिरी किनार्यावरील बुडणाऱ्या जहाजातून १९ जणांची सुटका
रत्नागिरी, दि. १७ : भारतीय तटरक्षक दलानं गॅबॉन या बुडणाऱ्या जहाजातून १८ भारतीय आणि एका इथिओपियन नागरिकासह १९ जणांची यशस्वीरित्या सुटका केली आहे. रत्नागिरी किनाऱ्याच्या पश्चिमेला काल सकाळी सुमारे ४१ मैल अंतरावर असतांना या जहाजामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती.
मदतीची मागणी झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ICGS सुजीत आणि ICGS अपूर्व या भारतीय तटरक्षक जहाजांना बचाव कार्यासाठी वळवण्यात आलं. तटरक्षक दलाचं प्रगत आणि हलकं हेलिकॉप्टरही मदतीसाठी तैनात करण्यात आलं. हे जहाज डांबरी बिटुमेन घेऊन जात होतं.
या क्षेत्रातील इतर व्यापारी जहाजांना याबाबत सतर्क करण्यात आलं आहे. जहाज वाहून जात असताना, सागरी प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्याच्या सूचनाही जहाज मालकांना देण्यात आल्या आहेत.
Source –
