ही पाहा राहुल गांधी यांची सर्वात मोठी घोषणा
नवी दिल्ली: काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास देशात रिक्त असलेली २२ लाख सरकारी पदे भरण्यात येतील असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे. राहुल गांधी यांनी ‘न्याय’ योजनेनंतर रिक्त जागा भरण्याचे मोठं आश्वासन मतदारांनी दिलं आहे.
राहुल गांधींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, “आज २२ लाख सरकारी जागा रिक्त आहेत. या जागा ३१ मार्च २०२० पर्यंत भरण्यात येतील. आरोग्य, शिक्षण इत्यादी विभागातील केंद्र सरकारच्या विविध राज्यातील जागा भरण्यात येतील.”
बेरोजगारी ही देशातील आजची सर्वात मोठी समस्या आहे, या समस्येवर उपाय काढण्यासाठी काँग्रेस नेहमी प्रयत्नशील असल्याचं राहुल गांधी यांनी आज पुन्हा दाखवून दिले आहे.
भारतात युवा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या नव्या युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच चालू आहे.
Today, there are 22 Lakh job vacancies in Government.
We will have these vacancies filled by 31st March, 2020.
Devolution of funds from the Center to each State Govt for healthcare, education etc. will be linked to these vacant positions being filled.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2019
