यंदाही अव्वल येत मुलींनीच मारली बाजी
मुंबई, दि.८: ज्याची समस्त विद्यार्थी व पालक वर्ग आतुरतेने वाट पाहत होते त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही मुलींचेच निकालावर वर्चस्व असून यावर्षी ९५.३५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला असून या विभागात ९७.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. याच वेळी मुंबई विभागाने निराशा केली असून ९०.९१ टक्के निकालासह सर्वात शेवटचे स्थान प्राप्त केले आहे.
गतवर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला होता. पण यावर्षी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – ९७.२२ टक्के
नागपूर – ९६.५२ टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
लातूर – ९५.२५ टक्के
कोल्हापूर – ९५.०७ टक्के
नाशिक – ९५.०३ टक्के
औरंगाबाद – ९४.९७ टक्के
पुणे – ९३.६१ टक्के
मुंबई – ९०.९१ टक्के
