Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील

जागतिक बँकेने वर्तवला अंदाज

रशिया-युक्रेन संघर्ष, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि अन्य कारणांमुळं जागतिक बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा जागतिक आर्थिक वाढीचा दर कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ८० वर्षांनंतर जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात तीव्र मंदीचा अनुभव येण्याची शक्यता असून, अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागण्याची भीती जागतिक बँकेनं काल जारी केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीच्या ५.७ टक्क्यांवरून जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर २.९ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे जागतिक बँकेनं म्हटलं आहे. किंमत नियंत्रण किंवा निर्यात निर्बंधांचा वापर करून महागाईचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये तर उत्पादन वाढीला प्रोत्साहन देऊन आणि व्यापार निर्बंध टाळून उपाययोजना कराव्यात असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *