माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीत पाठवायचा आहे : उद्धव ठाकरे
काल कोल्हापूरच्या तपोवन मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर टिका केली.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांना ते म्हणाले की आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र आता भाजप मध्ये घेऊ नका म्हणजे झालं. पुढे ते म्हणाले शरद पवारांना फक्त खुर्ची दिसते, बाकी त्यांना काहीही नको. तसेच राष्ट्रवादीला मत देणार असाल तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवा ! असे म्हणत अजित पवारांवरही त्यांनी टीका केली.
दरम्यान माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की माथाडी कामगारांचा नेता मला दिल्लीत पाठवायचा आहे, म्हणून मी साताऱ्यासाठी नरेंद्र पाटलांना भाजप कडून सेनेसाठी मागून घेतलं आहे.
या मेळाव्याला तपोवन मैदानावर मोठया प्रमाणात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झालेले होते.
