Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार झळकणार

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार झळकणार

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण लवकरच अभिषेक दुधैया यांच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

१९७१ च्या भारत पाक युद्धादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात भूज विमानतळाची धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी ‘स्काॅर्डन लीडर’ विजय कर्णिक आपल्या साथीदारांसोबत तिथे होते. विजय कर्णिक यांनी ३०० महिलांच्या मदतीने पुन्हा विमानतळाची धावपट्टी तयार केली. यामुळे जवानांना घेऊन विमानं युद्धभूमीवर जाऊ शकली.

या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. भूषणकुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगणसह सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, संजय दत्त, राणा दग्गुबती आणि ऐमी विर्क हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *