उद्या कोल्हापुरातून युतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात युतीचा प्रचार कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाने होणार आहे. युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या कोल्हापूरमध्ये फुटणार आहे.
रविवारी (ता.२४) सायंकाळी ५.०० वाजता कोल्हापुरातील तपोवन मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सभेच्या स्थळाची पाहणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाप्रमाणे पदाधिकार्यांचे मेळावे सुद्धा घेण्यात आले आहेत. शिवसेना भाजप युतीचे मंत्री आणि पदाधिकारी या सभेस संबोधित करणार आहेत. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सायंकाळी ६ वाजता तपोवन येथील जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुरुवात करणार आहेत.
