Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भरतनाट्यम vs लोकनृत्य, मथुरेत हेमा मालिनी-सपना चौधरी यांमध्ये चुरशीचा सामना

भरतनाट्यम vs लोकनृत्य, मथुरेत हेमा मालिनी-सपना चौधरी यांमध्ये चुरशीचा सामना

नवी दिल्ली: हरियाणाची सुप्रसिद्ध डान्सर व गायिका सपना चौधरी लवकरच राजकारणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मथुरा लोकसभा मतदार संघातून सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सपना चौधरी काँग्रेसच्या तिकीटावर भाजपच्या हेमा मालिनी यांच्याविरोधात मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

गेल्या वर्षी सपना चौधरीने सोनिया गांधी यांच्यासोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. तिने अनेक मुलाखतींमध्ये सोनिया गांधींचा आपल्यावर प्रभाव असल्याचं सांगितलं आहे.

भाजपने २०१४ साली हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री हेमा मालिनी यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी हेमा मालिनी यांनी राष्ट्रीय लोकदलच्या जयंत चौधरी यांचा जबरदस्त पराभव केला होता. हेमा मालिनी यांनी ३ लाख ३० हजार ७४३ मतांनी जयंत चौधरींना पराभूत केलं होतं. भाजपने गुरुवारी देशभरातील १८४ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. या नावांमध्ये हेमा मालिनी यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आली.

मथुरा मतदार संघात जाट समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसकडून सपना चौधरीला तिकीट मिळाल्यास जाट मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसला मदत होईल. या व्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेशात सपना चौधरीचे फॅन फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सपनाला काँग्रेसचे तिकीट मिळाल्यास हेमा मालिनी यांना मथुरेत मोठ्या आव्हानचा सामना करावा लागणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *