Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

IPL LOGO FULL twt

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

आयपीएलच्या १२ व्या हंगामाला आज, (दि.२३) पासून सुरुवात होत आहे. आयपीएलमध्ये पहिला सामना खेळण्याआधीच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबईचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा याला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांत खेळता येणार नाही. श्रीलंकेच्या या दिग्गज गोलंदाजाला राष्ट्रीय कर्तव्यावर परतावे लागणार आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना श्रीलंकेच्या निवड समितीने त्याला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले आहे.

आयपीएलच्या लिलावात मुंबईने त्याला प्रमुख गोलंदाज म्हणून २ कोटी रुपये बोली लावून संघात दाखल करून घेतले. सध्या तो श्रीलंकेच्या वन डे संघाचे कर्णधारपद भूषवित आहे आणि स्थानिक वन डे स्पर्धेत तो गॅल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ही स्पर्धा ४ ते ११ एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यामुळे मलिंगाला आयपीएलच्या पहिल्या सहा सामन्यांना मुकावे लागणार आहे.

‘आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद होता. परंतु, वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता त्यांनी मला स्थानिक वन डे स्पर्धेत खेळण्यास सांगितले. त्यामुळे मीही होकार दिला आणि मंडळालाच आयपीएल व मुंबई इंडियन्सला याबाबत कळवण्याची विनंती केली.

२६ मार्चला तो मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होणार आहे. सध्या मलिंगा श्रीलंकेच्या संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *