बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आदेश
मुंबई, दि.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशांसाठी आता सात दिवस गृहविलगीकरण आणि RT-PCR चाचणी बंधनकारक नसेल. काल त्या संबंधातले आदेश महापालिकेने निर्गमित केले आहेत.
महापालिकेनं २५ डिसेंबर रोजी जारी केलेल्या मागील आदेशानुसार, महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्येा १०० च्या पुढे गेली होती त्यामुळे या प्रवाशांना RT-PCR चाचणीसह सात दिवसांच्या गृह विलगीकरणात राहणं बंधकारक करण्यात आलं होतं.
आज मध्यरात्रीपासून हे नवे आदेश लागू होतील. दरम्यान अतिजोखीम असलेल्या देशांतले १८४ प्रवासी काल एका दिवसात मुंबईत दाखल झाले. यापैकी १४ जणांची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
