“…..तर खासदारांचं निलंबन मागे घेणार” – केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांची माध्यमांना माहिती
नवी दिल्ली: राज्यसभेतल्या सर्व निलंबित खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सदनात केलेल्या गैरकृत्याबाबत माफी मागितली, तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जोशी आज संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते. गैरवर्तन करणाऱ्या निलंबीत खासदारांच्या समर्थनार्थ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर विरोधकांतर्फे धरणं आंदोलन करणं हास्यास्पद आहे, असं ते म्हणाले. राज्यसभेत काल सुरक्षा विधेयक संमत झालं नाही, कारण केंद्र सरकारला सर्व खासदारांच्या उपस्थितीत ते मंजूर करायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
