एस.टी. कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी वगळता इतर सर्व मागण्यांवर चर्चा करायाला राज्य सरकार तयार
मुंबई, दि.२२: एस.टी. कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांवर चर्चा करायाला राज्य सरकार तयार असल्याचं प्रतिपादन वाहतूक मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. गेल्या २८ ऑक्टोबर पासून संपावर असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या संपाचा आजचा २५वा दिवस असून विलानीकरणासंदर्भात त्यांची मुख्य मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल विचारात घेऊन राज्य शासन संपक-यांच्या मागणीचा गंभीरपणे विचार करेल, असंही परब यांनी सांगितलं आहे.
