युरोप मधील ऑस्ट्रीयात आजपासून २० दिवसांची टाळेबंदी(Lockdown) लागू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर युरोपच्या ऑस्ट्रीया या देशात आज पहाटेपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. सर्व दुकानं उपहारगृह पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. तसेच सर्व मोठे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
जवळपास २० दिवस ही टाळेबंदी लागू असेल, मात्र १० दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अन्य युरोपीय देशांमध्येही निर्बंध कडक करण्यात आले आहेत.