अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक
मुंबई, दि.२: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची बारा तासांहून अधिक वेळ चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं, काल रात्री उशिरा त्यांना अटक केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाच वेळा समन्स बजावल्यानंतर काल सकाळी ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते.
समन्स रद्द करण्याची त्यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आणि खंडणी घेतल्याचे आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी मात्र त्यांच्यावर झालेले आरोप चुकीचे असल्याचं सांगत ते नाकारले आहेत.
