भाजप नेते अतुल भातखळकर यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई, दि.१९: मुंबई आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाचं तांडव चालू असून यादरम्यान अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री झालेल्या पावसात जवळपास ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी दुरदृश्य प्रणालीद्वारे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला आहे. ते म्हणाले की, “मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर…”
मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..@OfficeofUT pic.twitter.com/3b0dkBHZlc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
मागील ४८ तासांत मुंबईतील चेंबूर वाशीनाक, विक्रोळी, भांडूप, अंधेरी व वांद्रे आदि परिसरात दरड कोसळणे व विजेच्या धक्क्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
