राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सुरु असलेल्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती
कोरोनाचा प्रभाव अद्याप पूर्णपणे ओसरला नसतानाही राज्यभरातल्या सुमारे ८४ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सुरु असलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.
या संस्थेचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनमुक्त गावातले आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनानं जाहीर केल्यानंतर शैक्षणिक संशोधन परिषदेनं ऑनलाईन पद्धतीनं हे सर्वेक्षण केलं. सहभागी पालकांपैकी तब्बल ५२ टक्के पालक हे ग्रामीण भागातले असल्याचंही टेमकर यांनी स्पष्ट केलं आहे.
