Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांची आजपासून झाली सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षांची आजपासून झाली सुरुवात

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. यात आज पहिल्या दिवशी विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य, वास्तुविशारद आणि विधी शाखेच्या ७४ विषयांची परीक्षा होणार आहे.

बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४१९५ विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी प्रॉक्टर्ड प्रणाली वापरण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *