“ही आणिबाणीची परिस्थीती आहे याचे तुम्ही भान ठेवायला हवे” – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई, दि.२२: ही आणिबाणीची परिस्थीती आहे याचे तुम्ही भान ठेवायला हवे अशा शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे. कोरोनाकाळातल्या अव्यवस्थेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे.
कोविड १९ च्या संदर्भातल्या सर्व मार्गदर्शक सूचना या मुद्रित माध्यमांना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना द्यायला हव्यात यावर न्यायालयानं भर देतांनाच समाजमाध्यमं यात आणखी गोंधळ घातल असल्याचंही न्यायालयाने व्यक्त केलं. कोविड उपचारासाठीच्या अत्यावश्यक औषधांच्या माहितीसाठी एक पोर्टल असायला हवे असेही न्यायालयानं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपिठानं मुंबईतल्या एका वकिलाने दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही निरिक्षण नोंदवली.
Source – AIR
