(UPSC) नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्राकडून आणखी एक संधी
कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, नागरी सेवा परीक्षा दिल्या आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा ईच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे.
कोरोना साथीच्या काळात, परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्याने, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली, त्यामुळे परीक्षा देणे भाग पडले. त्यामुळेच, आणखी एक संधि मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, ३ हजार ८६३ उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी संख्या संपली असून, २ हजार २३६ उमेदवार वयोमार्यादेमुळे बाद झाले आहेत.
