देशातील नऊ राज्यांकडून ‘एक देश-एक शिधापत्रिका‘ योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण
देशातील नऊ राज्यांनी ‘एक देश-एक शिधापत्रिका’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया आत्तापर्यत पूर्ण केली आहे.
आंध्र प्रदेश, गोवा, हरियाना, कर्नाटक, केरळ, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे. अद्याप महाराष्ट्राने या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली नाहीये.
या राज्यांनी या योजनेच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल केले असून या राज्यांना त्या सुधारणांसाठी २३ हजार ५२३ कोटी रुपये अतिरिक्त निधी वितरीत करण्यात आला आहे.
या योजनेमुळे स्थलांतरित मजूर आणि त्यांच्या कुटुंबाला देशाच्या कुठल्याही भागातील रास्त धान्य दुकानातून शिधा घेणे शक्य होणार आहे.
Source- AIR
