महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथ येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी
शिवरात्रीनिमित्त राज्यातील सर्वच शिवमंदिरांत दर्शनासाठी भाविक पोहचत आहेत. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्री 12 वाजल्यापासून मंदिरात दर्शन सुरु झाले आहे.
अंबरनाथ शहरातील हे शिवमंदिर तब्बल 958 वर्ष जुने मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविकांचा महासागर मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतो. स्थानिक ग्रामस्थ आणि पारंपरिक पुजाऱ्यांच्या हस्ते मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात येते आणि त्यानंतर दर्शनाची रांग खुली करण्यात येते. वालधुनी नदीच्या तिरावर वसलेले वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे हेमांडपंथीय वास्तुशैलीतील मंदिर युनेस्को ने जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत मोडते.
