फोन करण्यासाठी संबंधित क्रमांकाच्या आधी शून्य लावावा लागणार
लँडलाईन फोनवरुन मोबाईलवर फोन करण्यासाठी संबंधित क्रमांकाच्या आधी शून्य लावावा लागणार असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं सांगितलं.
पुढच्या वर्षी १५ जानेवारीपासून हा बदल लागू होईल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण – ट्रायच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
लँडलाईन वरुन लँडलाईनवर आणि मोबाईल वरुन लँडलाईनवर फोन करण्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं.
