Maharashtra Police
निवडणुकीच्या काळात उपायुक्त ते निरीक्षकांच्या बदल्या
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच पोलीस महानिरीक्षक ते अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आज राज्य शासनाने उपायुक्तांपासून निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
वसंत परदेशी यांची वाशीम आणि संभाजी कदम यांची पुणे शहरमध्ये उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षिका आरती सिंह यांची नाशिक ग्रामीणच्या तर वाशीमच्या मोक्षदा पाटील यांची औरंगाबादच्या ग्रामीणच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तसेच धुळ्याचे अपर पोलीस आयुक्त विवेक पानसरे यांना ठाणे शहरमध्ये उपायुक्ताची जबाबदारी सोपविली आहे. संजीव कांबळे यांची परिवहन आयुक्तालयात तर सहाय्यक पोलीस आयुक्त रफिक शेख युसूफ शेख यांची नवी मुंबईत नियुक्ती केली आहे.
तसेच पोलीस निरीक्षकांच्यादेखील आज बदल्या करण्यात आल्या. त्यानुसार मुंबई पोलीस दलातील विश्वनाथ जाधव (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), जितेंद्र राठोड (ठाणे शहर), हेमंत पाटील (धुळे), अरविंद काळे (कोल्हापूर), सुधीर संखे (पालघर), दत्तात्रय पाटील (पालघर), दादा गायकवाड (पुणे शहर) यांचा समावेश आहे.
